जरा विसावू या वळणावर

 जगावर कोरोना नामक संकट आलं आणि सारी मानव जात भयभीत झाली. लॉकडाउन घोषित झालं  आणि धावाधाव करणारी जनता घरात बंदिस्त झाली. 

कोरोनाच संकट मोठंच आहे , या कोरोनाने कित्येकांचे प्राणही घेतले अगदी मान्य. पण वाईटातून काही चांगलं बघूया आणि आलेल्या नैराश्याला थोडं विसरूया.


   दिवसभरात रात्री उशिरा एकमेकांना भेटणारे ,दिसणारे कुटुंबीय चोविस तास एकत्र घालवू लागले जे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कधी घडलं नव्हतं. 

  कामवाली बाई नाही म्हणून घरकामं करायला घरातल्या प्रत्येकाचे हात मदतीसाठी सारसावू लागले. 

स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून पटकन होणारं काहीतरी करते किंवा बाहेरच जाऊया का ?म्हणणारी आई रोज नवनवीन प्रकारच्या डिशेस समोर घेऊन येऊ लागली. "डोमिनोज पेक्षा तू घरी केलेला पिझ्झाच एक नंबर!! "आता के एफ सी बंद !"आई आपण घरीच हे असं चिकन करत जाऊ." अशी वाक्य कानावर येऊ लागली.

 बाहेर जेवायला न जाता सुद्धा घरातच वीकएंड  किती आनंदात जातो!! हे पुरेपूर पटायला लागलं. 

आई हे बघ बाबांच  पेंटिंग!!" काय झक्कास केलंय". 

"बाबा मला पण शिकवा ना गिटार वाजवयला"

बाबा भाजी आणि किराणा आणायला बाहेर जाताय , मास्क लावायला विसरलात ना, आणि हे सॅनिटायझर!! आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा

 अशा गोड संवादातून धावणाऱ्या माणसांमधल्या  कला बाहेर पडू लागल्या आणि एकमेकांबद्दलची काळजीही दिसू लागली!

.

खाली उतरताच बिल्डिंग चा वॉचमन म्हणतो साब आज दोनो विंग की लिफ्ट और स्टाइरकेस दवाई से साफ की. अब आगे से हमेशा साफ रखेंगे. 

कोरोना खूपच  वाईट आहे पण कोरोनाने कुटुंबातील माणसं एकत्र आणली , धावणाऱ्या माणसांचे हरवलेले निवांत क्षण मिळवून दिले. कोरोनाने स्वच्छता शिकवली. 

गरिबांना अन्नदान करणाऱ्या लोकांमधून कोरोनाने माणुसकीचे दर्शन घडवले. जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना बरं करणाऱ्या डॉक्टर , नर्सेस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या रूपातून देवदर्शनच दिले.दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी  रोज दोन पेग टाकून रिलॅक्स होण्याऱ्यांना कौटुंबिक आनंदाची नशा अन त्याने मिळालेली शांत झोप आणि समाधानाचा हाँगोवर सुखावू लागला. कोरोनाची नक्कीच हकालपट्टी होणार आहे ,पुन्हा आपली धवाधाव सुरू होईल ,भीतीचं सावट निघून जाईल पण सध्या तरी जरा विसवू या वळणावर!!!

 

अपर्णा….( ADP)

Comments

Popular posts from this blog

लघुकथा

माझं काम माझा अभिमान