लघुकथा
हॅलोsss शेखर अरे किती वेळ लागणार आहे? आज सकाळची OPD लवकर संपव म्हणून सांगितलं होतं ना तुला? वास्तुशांतीला जायचं आहे मोसमीच्या घराच्या, उशीर होतोय ! विसरला नाहीस ना? "हो हो शेवटचे दोन पेशंट आहेत ते झाले की निघतोय".साडे आकाराचा मुहूर्त आहे ना? पोहोचू आपण वेळेत! सगळं लक्षात आहे! अरे दहा वेळा फोन येऊन गेला तिचा ताई कधी येताय दोघं? सगळी तयारी झालीय, ताई लाल रंगाची पैठणी घालून ये! आणि मग पुढे तिची बडबड काही थांबेल तर मोसमी कुठली!! हो हो आता तुझी बडबड थांबली तर मी लवकर निघू शकेन ना? ओके ठेवते मी फोन तू लवकर निघ ,माझं आवरून झालंय! शेखर आणि मंजिरी ऋतुरंग सोसायटीत पोहोचले , विंग बी मध्ये शिरताच बोर्डवर नाव दिसलं *503: मोसमी राणा* मंजिरी क्षणभर स्तब्ध होऊन त्या नावकडे आनंदाने बघत राहिली. मंजिरीताई उशीर होतोय ना? सगळे खोळंबले आहेत ना आपल्यासाठी? हो रे चल चल!! लिफ्ट पाचव्या मजल्यावर पोहोचली, सुंदर लाल रंगाची भरजरी साडी नेसून , नटलेली , गजरे माळलेली मोसमी दो...