जरा विसावू या वळणावर
जगावर कोरोना नामक संकट आलं आणि सारी मानव जात भयभीत झाली. लॉकडाउन घोषित झालं आणि धावाधाव करणारी जनता घरात बंदिस्त झाली. कोरोनाच संकट मोठंच आहे , या कोरोनाने कित्येकांचे प्राणही घेतले अगदी मान्य. पण वाईटातून काही चांगलं बघूया आणि आलेल्या नैराश्याला थोडं विसरूया. दिवसभरात रात्री उशिरा एकमेकांना भेटणारे ,दिसणारे कुटुंबीय चोविस तास एकत्र घालवू लागले जे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कधी घडलं नव्हतं. कामवाली बाई नाही म्हणून घरकामं करायला घरातल्या प्रत्येकाचे हात मदतीसाठी सारसावू लागले. स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून पटकन होणारं काहीतरी करते किंवा बाहेरच जाऊया का ?म्हणणारी आई रोज नवनवीन प्रकारच्या डिशेस समोर घेऊन येऊ लागली. "डोमिनोज पेक्षा तू घरी केलेला पिझ्झाच एक नंबर!! "आता के एफ सी बंद !"आई आपण घरीच हे असं चिकन करत जाऊ." अशी वाक्य कानावर येऊ लागली. बाहेर जेवायला न जाता सुद्धा घरातच वीकएंड किती आनंदात जातो!! हे पुरेपूर पटायला लागलं. आई हे बघ बाबांच पेंटिंग!!" काय झक्कास केलंय". "बाबा मला पण शिकवा ना गिटार वाजव...